Monday 5 December, 2011

दिसं जातील, दिसं येतील.

आयुष्यात कधीकधी अचानक, अकल्पित अशा काही घटना घडतात की त्यामुळे शांत जीवन जगणारी माणसे कोलमडून पडतात. सैरभैर होतात.
परंतु मध्ये थोडासा काळ गेला की पुन्हा जीवनाची गाडी पटरीवरुन धावू लागते.
पण मधल्या काळात येणा-या अनुभवांना संयमितपणे पचवावे लागते.

अशा घटनांमधूनच आपली आणि परकी माणसं कळतात. आपले व्यक्तिमत्व समृद्ध होते.
फक्त हिंमत मात्र हारता कामा नये.
म्हणूनच ओठावर गीत रेंगाळू लागते-
दिसं जातील, दिसं येतील,
भोग सरंन सुख येईन.

Sunday 31 July, 2011

झिम्माड पाऊस !

आज पावसाची प्रतिक्षा करीतच परसबागेत फुलझाडे लावली.
मोगरा, रातराणी, जास्वंद , घाणेरी, स्वस्तीक इ.ची रोपे लावली.
खूप दिवसात मला या कामासाठी वेळ काढता आला. बाहेर मस्त झिम्माड पाऊस पडतोय. मी पाऊसवेडी!