Tuesday 22 January, 2013

मथु सावंत


डॉ. मथु सुरेश सावंत
मराठी विभाग, पीपल्स कॉलेज, नांदेड.



प्रकाशित पुस्तके :
१) पाण्यातील पायवाट (कथासंग्रह)
२) राहु केतु (कादंबरी)
३) जिनगानी (कादंबरी)
४) समाजशिक्षिका सावित्रीबाई फुले (चरित्र)
५) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (चरित्र)
६) राजर्षी शाहू महाराज (चरित्र)
७) नवरसांची नवलाई (नाटक)
८) तिची वाटच वेगळी (कथासंग्रह)
९) कथाकार भास्कर चंदनशिव (संशोधन)
१०) निवडुंगाची फुलं (बाल कथासंग्रह) 
११) पाणबळी (कथासंग्रह)
१२) सर्जनाचा शोध (समीक्षा)
१३) लगीनघाई ? मुळीच नाही ! (नाटक)



प्राप्त पुरस्कार व सन्मान :
१) ‘पाण्यातील पायवाट’ ह्या कथासंग्रहाला फुलंब्री (जि. औरंगाबाद) येथील स्वा. सावरकर साहित्य पुरस्कार प्राप्त.


२) जिल्हा परिषदेच्या राजकारणावर आधारित ‘राहु-केतु’ ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा अण्णाभाऊ साठे पुरस्कार, म.सा.प. औरंगाबादचा कै. नरहर कुरूंदकर साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र दलित साहित्य अकादमीचा फुले-आंबेडकरवादी साहित्य पुरस्कार आणि बडोदा (गुजरात) येथील मराठी वाङ्‌मय परिषदेचा अभिरूची गौरव पुरस्कार असे चार पुरस्कार प्राप्त.


३) ग्रामीण भागातील विधवा आणि घटस्फोटित स्त्रियांच्या प्रश्नांवरील ‘जिनगानी’ ह्या कादंबरीला कोपरगाव (जि. अहमदनगर) येथील रोहमारे ट्रस्टचा भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार प्राप्त.


४) ‘समाजशिक्षिका सावित्रीबाई फुले’ ह्या पुस्तकाला महानुभाव विश्वभारती अमरावती या संस्थेचा महानुभाव ग्रंथोत्तेजक पुरस्कार प्राप्त.


५) ‘तिची वाटच वेगळी’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार, सोलापूरचा भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार, प्रवरानगरचा पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार, पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आनंदीबाई शिर्के पुरस्कार, जगद्‍गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचा पुरस्कार, हिंगोलीचा संत नामदेव साहित्य पुरस्कार आणि लोहा येथील खोब्राजी चव्हाण साहित्य पुरस्कार असे सात पुरस्कार प्राप्त.
सदर कथासंग्रहाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात तसेच सोलापूर विद्यापीठाच्या एम.ए.च्या अभ्यासक्रमात समावेश.
या कथासंग्रहातील कथांचे नांदेड आकाशवाणी केंद्रावरून क्रमशः अभिवाचन झाले. तसेच आकाशवाणीच्या नांदेड व उस्मानाबाद केंद्रावरून कथांचे नाट्यीकरण सादर करण्यात आले.
या प्रसारणाला ग्रामीण श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.


६) ‘नवरसांची नवलाई’ या नाटकाला कोल्हापूरच्या मराठी बालकुमार साहित्य सभेचा मातोश्री उमाबाई निगवेकर साहित्य पुरस्कार प्राप्त.


७) ‘निवडुंगाची फुलं’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ‌मय निर्मितीचा साने गुरूजी पुरस्कार, बुलडाणा येथील भारत विद्यालयाचा शशिकलाताई आगाशे वाङमय पुरस्कार आणि मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर या संस्थेचा शेवडे गुरूजी साहित्य पुरस्कार असे एकूण तीन पुरस्कार प्राप्त.


८) ‘कथाकार भास्कर चंदनशिव’ या ग्रंथाला औरंगाबादच्या कै. धोंडीराम माने विकास प्रबोधिनीचा गुणिजन साहित्य पुरस्कार प्राप्त.


९) सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल रोटरी क्लब, नांदेड या संस्थेतर्फे सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव.


१०) सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल लोकशिक्षण विद्यापीठातर्फे सन्मानपत्र देऊन गौरव.


११) साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जनजागृती महिला प्रतिष्ठानचा सेवाभावी साहित्य पुरस्कार प्राप्त.


१२) महिला व बालकल्याणाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री ना. सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरव.


१३) कुंटूर येथे झालेल्या लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.


१४) बीड येथे आयोजित (दि. २ व ३ फेब्रु. २०१३) चौथ्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. 


१५) साहित्यप्रेमी भगिनीमंडळ पुणे या संस्थेचा मालतीबाई दांडेकर पुरस्कार. (दि. २८ जाने. २०१३)



1 comment: